आरोग्यताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

महा वनौषधी प्रकल्पाचा सभासद नोंदणी शुभांरभ कार्यक्रम संपन्न

दुर्मिळ वनौषधींचा वापर रोजच्या जीवनात झाला तरच भविष्यातील कोरोनासारख्या आजारांवर आपण सहजपणे मात करू शकतो : आयुर्वेदाचार्य नारायण डवर

मुदाळ तिट्टा प्रतिनिधी :

महा वनौषधी संवर्धन, संशोधन, पर्यटन, उपचार, प्रशिक्षण केंद्र या प्रकल्पाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ मुदाळतिट्टा येथील महाराष्ट्र एन जी ओ समिती कार्यालयांमध्ये संपन्न झाला यावेळी बोलत असताना निवेदिता येडूरे, प्रकल्प संचालक, म्हणाल्या दुर्मिळ वनौषधी, झाडे यांचे संवर्धन, संशोधन व्हावे व त्यातून आयुर्वेदाची व्याप्ती वाढावी, जंगलांचे संवर्धन, जनकल्याण व्हावे, हा महा वनौषधी प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

यावेळी बोलताना वनौषधी प्रकल्पाचे मुख्य आयुर्वेदाचार्य नारायण डवर म्हणाले पारंपरिक वनौषधींचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. दुर्मिळ वनौषधींचा वापर रोजच्या जीवनात झाला तरच भविष्यातील कोरोनासारख्या आजारांवर आपण सहजपणे मात करू शकतो.

यावेळी प्रकल्पाची पार्श्वभूमी मांडताना प्रकल्पाचे संचालक युवराज येडूरे म्हणाले दुर्मिळ वनौषधींचा होणारा ऱ्हास रोखणे,
देशास आयुर्वेदिक उत्पादनांचा मुबलक पुरवठा करणे, जंगलक्षेत्र, वनौषधी वनस्पतींची व्याप्ती वाढवणे, आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य सुरक्षित करणे, भारतीय आयुर्वेद संस्कृतीचे संवर्धन करणे.

महा वनौषधी प्रकल्पाचे सभासदांना होणारे फायदे :

महा वनौषधी प्रकल्पाच्या सदस्यांना आकर्षक लाभांश मिळेल. तसेच आजीवन सभासदत्व, प्रकल्पातील गुंतवणूक ही देशाच्या आयुर्वेद क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रकल्पातील पर्यटन उपक्रम, रुग्णांवरील उपचारांवरील खर्चात सभासदांना 20 टक्के सवलत मिळेल, निसर्गोपचार, पंचकर्म चिकित्सा, मसाज थेरपी व संबंधीत उपचारांवर 20 टक्के सवलत, दुर्मिळ जंगलातील, डोंगरातील भाज्या, अल्पोपहार, भोजन शुल्कात 20 टक्के सवलत, सर्व सभासदांना प्रकल्पातील औषध कारखान्यात तयार होणाऱ्या वनौषधी उत्पादन, औषधांवर 20 टक्के सवलत, सभासदांना प्रकल्पातील निवासी संकुलातील सुविधांमध्ये 20 टक्के सवलत दिली जाईल, प्रकल्पस्थळी विनामुल्य प्रवेश, वाहनतळ विनामुल्य उपलब्ध होईल, महा वनौषधी प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्यांना वार्षिक 10 टक्के व्याज दराने परतावा.

आपली असोसिएशन विविध सामाजिक उपक्रमांद्वारे जनप्रबोधन व लोकहिताचे काम अखंडपणे करत आहे. हे समाजसेवेचे व्रत केवळ एकट्याचे नाही, हे आपण जाणतो. आपणासारखी माणसे आमच्यासोबत आहेत म्हणून हे शक्य होत आहे. नियोजित महा वनौषधी प्रकल्प 9 एकर जागेत आम्ही राबवत आहोत. यासाठी आपल्यासारख्या दानशूर व सामाजिक जाणीव असलेल्या मान्यवरांकडून आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा .

या वेळी तुकाराम भाकरे,नेताजी कांबळे,गंगाराम झोरे,संजय परीट,विजय भाटे उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks