ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पवन देसाई यांचे उज्वल यश

कडगाव :
चिंचणी, पालघर येथे झालेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ रस्सीखेच स्पर्धेत (टग-ऑफ-वॉर) कडगाव ता.भुदरगड येथील पवन प्रकाश देसाई यांनी तिन्ही वजनी गटात सुवर्णपदक मिळवून बाजी मारली असून त्यांच्या या यशाचे संपूर्ण राज्यभरातून कौतुक होत आहे.
पवन देसाई यांच्या संघातील आकाश सुरेश नवाळे याने दोन सुवर्णपदक तर संतोष राजेंद्र कोगणुळकर याने देखील दोन सुवर्णपदकांची कमाई केली.
पवन ला महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार विजेते बिभीषण पाटील, दक्षिण आशियाई संघटनेच्या सचिवा माधवी पाटील मॅडम, जिल्हा संघटनेच्या सचिवा दया कावरे मॅडम, विवेक हिरेमठ, पांडुरंग पाटील तात्या, दत्ताआण्णा देसाई, ज्योतिबा संघाचे कोच दत्तात्रय मणगुतकर, प्रकाश देसाई, पत्रकार बाजीराव देसाई, प्रशांत पाटील, अक्षय पाटील, रोहित पाटील, संदीप चौगले आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.