कुमार भवन, शेणगाव शाळेत पत्रकार दिन उत्साहात साजरा

गारगोटी :
श्री मौनी विद्यापीठ संचलित आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी बी.एड्.अभ्यासक्रमांतर्गत शालेय आंतरवासिता टप्पा-2 व कुमार भवन शेणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 6 जानेवारी 2022 या दिवशी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमार भवन, शेणगाव शाळेचे मुख्याध्यापक डॉ. एस् .बी.शिंदे उपस्थित होते. आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापिका व मार्गदर्शक पी.एस् .देसाई उपस्थित होत्या. कुमार भवन, शेणगाव शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,बी.एड्. छात्र प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थितीत होते.
अध्यक्षीय मनोगतात डॉ.एस्.बी.शिंदे सर यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात भित्तीपत्रिका उद्घाटनाने केली. बी. एड्. छात्र प्रशिक्षणार्थी सुजाता पाटील यांनी पत्रकार दिनाची पार्श्वभूमी सांगून शुभेच्छा दिल्या.