क्रीडाताज्या बातम्या
राधानगरी क्रिकेट स्पर्धेत कुडूत्रीचा शिवशाहू स्पोर्ट्स प्रथम विजेता

कुडूत्री प्रतिनिधी :
राधानगरी प्रीमियर लिग (२०२१) व सयोंजन कमिटी यांचेवतीने घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत कुडूत्री येथील शिवाजी चौगले यांच्या शिवशाहू स्पोर्ट्स संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला.या स्पर्धेत दहा संघानी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना किताब देण्यात आलेत त्यामध्ये मालिकावीर विशाल भरणकर,उत्कृष्ट फलंदाज रवी जाधव,उत्कृष्ठ गोलंदाज तानाजी चौगले आदींचा समावेश आहे.
विजेत्या संघांना १७०००,७०००,३०००,३००० अशी बक्षीसे व चषक वितरण करण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुजित साळोखे, मोहन कांबळे, शिवराज पाटील, मोहन हसुरे, विकास किरुळकर, भालचंद्र पाटील आदीनी परिश्रम घेतले.
चषक देणगीदार म्हणून प्रणवगिरी पालकर,निवास कांबळे,बाळासाहेब कळंबकर,कुंदन सापते यांचे आयोजन कमिटीला सहकार्य लाभले.