ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूरचा संदेश कुरळे टेनिस स्पर्धेत चमकला ; दुहेरीत विजेतेपद

कोल्हापूर प्रतिनिधी :
कोल्हापूरचा संदेश कुरळे ऑल इंडिया नॅशनल ज्युनियर स्पर्धेत ( १८ वर्षाखालील ) चमकला. त्याने दुहेरीत विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा चेन्नई येथे पार पडली. संदेश कुरळेने चेन्नईत झालेल्या १८ वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस स्पर्धेत क्ले कोर्टवर पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला. त्याने हरियाणाच्या चिराग दुहान याच्या साथीने दुहेरीच्या अंतिम सामन्यात दीप मुनिम आणि धनंजय अत्रेय यांचा ६ – २, ७ – ५ असा सरळ सेटमध्ये पराभव केले.