शेणगांव येथे जुगार अड्ड्यावर छापा; ४,२२,१२०रू. च्या मुद्देमालासह १३ आरोपी अटकेत.

गारगोटी प्रतिनिधी :
काल रात्री नऊच्या सुमारास शेणगांव ( ता.भुदरगड ) येथील शिवारातल्या जुगार अड्यावर भुदरगड पोलीसांनी धाड टाकून ४,२२,१२० रुपयाच्या मुद्देमालासह १३ आरोपी अटक केले. पोलीस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक सतिश मयेकर, यांच्या पथकाने ही कारवाई केली.या कारवाईत पोलीस सतिश पाटील ,दिगंबर बसरकर, किरण पाटील,राहूल पाटील, विश्वास पाटील हे सहभागी झाले होते.अटक केलेल्या आरोपीवर पुढील कारवाई सुरु केल्याचे सांगण्यात आले.
शेणगांव येथील गावाबाहेरील विटभट्टीच्या परिसरात परसू कुंभार यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये चालू असलेल्या जुगार अड्याची पोलीसांना कुणकूण लागताच छाप्याची जय्यत तयारी करून पोलीसांनी या जुगार अड्यावरील सर्वांना रंगेहात पकडले.

जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम ४ ,५ भा द वि कलम १८८,२६९,२७० व २७१ सह महराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (३),१३५ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब) सह, महराष्ट्र कोविड उपाययोजना २०२०चे नियम ११ तसेच साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ चे कलम २,३ व ४ अन्वये गुंन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी जयसिंग शिंदे पोलीस यांनी सदरची तक्रार दाखल केली असून या बाबतचा तपास पोलीस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बबिता नलवडे या करत आहेत.
यातील आरोप पत्रात पोलीसांनी असे म्हटले आहे की, नशीबाच्या भरोषावरील पत्यांचा जुगार कोणत्याही कौशल्याशिवाय पैसे लावून खेळताना हे आरोपी आढळून आले. महाराष्ट्र कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव रोकणे कामी कोणतेही सहकार्य न करता शासनाने घालून दिलेल्या अटी शर्थी व नियमांचे उलंघन करून मा जिल्हाधिकारी सो यांनी घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन करून व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य केले या आरोपींनी केले आहे.यामध्ये सदर आरोपींनी समाजामध्ये संसर्ग पसरवण्याची घातक कृती केल्याचे दिसून आल्याने सदरील आरोपीवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संजय श्रीपती एकल वय ५५ (शेणगांव), धनाजी दत्तू पावले वय ४७ रा गारगोटी, सुनिल प्रभाकर नागवेकर वय ५५ (शेणगांव), मिलिंद मधुकर शुक्ल वय ४५ ( गारगोटी),अशोक केरबा टाकवेकर वय ३२ (देवकेवाडी), रविंद्र राजाराम लोहार वय ३५ (आकुर्डे), कृष्णात धोंडिराम सुतार वय ४८ ( आकुर्डे),संतोष शंकर कडव वय ४० (आकुर्डे), दिलिप मारूती वडर वय ३७ (गारगोटी) शैलेश शिवाजी गुरव वय ३६ (गारगोटी)जयसिंग राजाराम कुंभार वय ५० ( शेणगांव), नारायण दत्तात्रय खटावकर वय ४५ ( शेणगांव), संजय काळू कुंभार वय ४५ ( शेणगांव) असे हे आरोपी आहेत.