ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : तरुणाची नैराश्यातून आत्महत्या; स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने तरुणाने घेतला राहत्या घरी गळफास

कोल्हापूर :

स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने नैराश्येतून गजानन धोंडिराम गुरव (वय 23, रा. जाखले, ता. पन्हाळा) या तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. स्पर्धा परीक्षेत अपयश आल्‍याने तरूणाने जीवन संपवल्‍याने परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.

जाखले येथील गजानन गुरव याने तीनवेळा स्पर्धा परीक्षा दिली होती. यामध्ये त्याला अपयश आले होते. त्यानंतर त्याने दिलेल्या एमपीएससीच्या परीक्षेत गजाननाला दोन विषयांमध्ये कमी गुण मिळाल्याने तो चार दिवसांपासून नाराज होता.

या नैराश्यातून त्याने आपल्या राहत्या घरी कोणी नसल्याचे पाहून आत्महत्या केली. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे. त्याच्या मागे आई, भाऊ असा परिवार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks