ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पट्टणकोडोली मध्ये औषध मारताना शॉक लागून मजुराचा मृत्यू

हातकणंगले प्रतिनिधी :
पट्टण कोडोली (ता.हातकणंगले) येथे उसाच्या शेतामध्ये तणनाशक मारत असताना पडलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. आण्णासो दादू रांगोळे (वय ५२ वर्षे) असे त्यांचे नाव असून या घटनेमध्ये मौला नबी महात (वय ४७ वर्षे) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद हुपरी पोलिसात झाली आहे.