ताज्या बातम्यामहाराष्ट्र
ब्रेकिंग न्यूज : मेघोली धरण फुटले; नदीकडील बाजूच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

गारगोटी :
मेघोली लघु पाटबंधारा फुटला असल्याने नदीकडील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीकडील बाजूच्या गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण यामुळे निर्माण झाली आहे.
भुदरगड तालुक्यातील मेघोली लघू पाटबंधारे तलाव बुधवारी रात्री फुटला. केवळ अडीच तासांत या तलावातील पाणी वाहून जाऊन तलाव रिकामा झाला आहे. मेघोली तलाव मधील पुराच्या पाण्यात बुडून नवले येथील जिजाबाई धनाजी मोहिते या महिलेसह चार जनावारांचा मृत्यू झाला. तलावाच्या बांधातील माती, दगड, गोटे वाहून ओढ्याकाठच्या शेतीत पडल्याने शेकडो एकर शेतीसह पिके पुर्णतः: उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे या परिसरात ढगफुटी सारखे दृश्य झाले आहे.