कोल्हापूर : कासारवाडी – सादळे घाटात ऊसतोड मजुरांचा ट्रॅक्टर पलटी, एक ठार २५ जखमी

कोल्हापूर प्रतिनिधी :
कासारवाडी – सादळे घाटात आज (रविवार) सायंकाळी ज्योतिबाच्या दर्शनाला गेलेला ऊसतोड मालक व मजुरांची ट्रॅक्टर ट्रॉली सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पलटी झाली. या अपघातात दोन जण अतीगंभीर आहेत, तर बावीस जण जखमी झाले आहेत.
कोरेगाव (ता.वाळवा) जिल्हा सांगली येथील हिंदुस्तान ट्रॅक्टर ( एम.एक्स.डब्लू. २५८ ) मालक यशवंत जाधव व गावातील ऊसतोड कामगार हंगामातील ऊसाची शेवटची उसाची खेप भरून गुलाल उधळून वाजत गाजत आज (रविवार) सकाळी वारणा साखर कारखान्यावर रिकामी केली होती. तेथून आज रविवार ज्योतिबाचा खेटा म्हणून हे सर्वजण ज्योतिबा दर्शनासाठी आले होते. दुपारी दर्शन आवरून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कासारवाडी घाटात ट्रॅक्टरसह पाठीमागे दोन ट्रॉली होत्या. पुढील ट्रॉलीत २२ मजूर होते.
कासारवाडी घाटातील वरून येताना पहिल्याच वळणावर एका महाविद्यालयाच्या जवळ मोठे वळण आहे. तेथून कसेबसे ट्रॅक्टर व दोन्ही ट्रॉल्या सावरल्या, त्यानंतरच्या येणाऱ्या कासारवाडी घाटातील पहिल्या वळणावर ट्रॅक्टरचा वेग जास्त असल्याने ट्रॅक्टरचे पाठीमागील मोठे चाक अक्षरशः निघून पडले आणि ट्रॅक्टर व पुढील मजुरांनी भरलेली ट्रॉली वळणावरील कठड्यावरून सुमारे वीस ते पंचवीस फुटांवरून खाली पडली
या अपघातात ट्रॉलीतील सर्व माणसे घाटातील इतरत्र दगडावर पडून जखमी झाले. ड्रायव्हर व एक व्यक्ती ट्रॉलीखाली सापडली. आज रविवार असल्याने वाहनांची वर्दळ अधिक होती. यामुळे ही बातमी सर्वत्र पसरल्याने तत्काळ ॲम्बुलन्स बोलवून जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.