कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील धक्कादायक घटना : “आरव केसरे” चा मृतदेह त्यांच्याच घरामागे संशयास्पदरित्या सापडला.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
शाहुवाडी तालुक्यातील वारणा कापशी येथून बेपत्ता झालेल्या आरव केसरे या बालकाचा मृतदेह संशयास्पद रित्या त्यांच्याच घराच्या मागे आढळून आल्याचे समजते. तर आरव चा मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी खेळण्यासाठी म्हणून बाहेर गेलेला आरव वय 6 वर्षे दि. 3 ऑक्टोबर पासून बेपत्ता झाला होता. त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न झाला. परंतु तो काही सापडला नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आज दि. 5 ऑक्टोबर रोजी आरव चा मृतदेह त्यांच्याच घराच्या मागे संशयास्पदरित्या कोणीतरी अज्ञाताने आणून ठेवला असल्याचे समजते. दरम्यान मृतदेहावर गुलाल टाकण्यात आला असून, शरीरावर ठिकठिकाणी जखमा असल्याचे समजते. याबाबत शव विच्छेदन झाल्यानंतरच खरी माहिती समजेल.
दरम्यान हा प्रकार नरबळी किंवा, खुनशी प्रवृत्तीतून झाला असावा, अशी चर्चा परिसरातून ऐकावयास मिळत आहे.