ताज्या बातम्या

कोल्हापूर, सातारा, सांगली ,पुण्यात मुसळधार पाऊस, कोकणात पुढील 3 दिवस जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता – हवामान विभाग

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे 

 सर्वत्र नवरात्र उत्सव दिमाखात साजरा होत असताना या उत्सवात पावसाने देखील हजेरी लावली आहे. शुक्रवारी दुपार पासून जोरदार वाऱ्यासह पावसाने कोल्हापूर शहरात हजेरी लावली. तर पुण्याला सलग दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यासह सातारा शहरासह उपनगरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार बरसला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात पुढील तीन – चार दिवस वीजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पुण्यात सायंकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवरुन धो-धो पाणी वाहत होते. दरम्यान राज्यात पुढील ३ – ४ दिवस जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. 

      बंगालच्या उपसागरात सध्या चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागरापासून कर्नाटकच्या भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याच्या परिणामामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात गुरुवारी पुण्यासह अन्य काही भागात पावसाने हजेरी लावली. तसेच शुक्रवारी देखिल पावसाने जोरदार वाऱ्यांसह अनेक ठिकाणी हजेरी लावली. तर पुणे आणि सातारा शहराला पावसाने झोडपून काढले. 

     कोकण, मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात पुढील तीन – चार दिवस वीजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासह विदर्भात तुरळक पावसाच्या हजेरीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. तो राजस्थानमधून बाहेर पडतो आहे. पण, महाराष्ट्रात ऑक्टोंबर पर्यंत त्याचा प्रवास सुरुच राहिल व या दरम्यान तो जोरदार बरसणार आहे. त्यामुळे ऑक्टोंबर महिन्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरीची शक्यता राहणार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks