ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर : काळम्मावाडी धरणात केवळ 1.31 टीएमसी इतका पाणीसाठा

काळम्मावाडी धरणात पाण्याचा ठणठणाट असून धरण कोरडे होण्याची भीती आहे. धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. धरणात मंगळवारी सकाळी केवळ 1.31 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक होता. राधानगरी धरणातही 1.66 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले
काळम्मावाडी धरणाची क्षमता 25.39 टीएमसी इतकी आहे. दरवर्षी जून महिन्यात धरणात 5 ते 7 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असतो यावर्षी पावसाने ओढ दिल्याने 20 जून रोजी धरणात केवळ 1.31 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. येत्या काही दिवसांत तो आणखी कमी होणार आहे. पाणीसाठा कमी झाल्याने धरणाची मुख्य भिंत दिसू लागली आहे.