कोल्हापूर : राजाराम बंधारा 25 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर कालावधीत वाहतुकीसाठी बंद

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
राजाराम को.प. बंधा-याचा Wearing Coat ची झीज झाली असून बंधाऱ्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने बंधारा वाहतुकीस अयोग्य झाला आहे. बंधाऱ्याची दुरुस्ती सुरू करण्याचे नियोजन असून राजाराम बंधा-यावरून होणारी वाहतुक २५ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०२१ या कालावधीत बंद करावी लागणार आहे, अशी माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे.
यामध्ये बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या संरक्षक स्तंभांची दुरूस्ती, बंधाऱ्याचे उर्ध्व बाजूस सलोह Beam टाकणे, संपुर्ण बंधाऱ्यावर लोहसळी टाकणे, ठिकठिकाणी Anchorage करणे व Wearing Coat चे M-२५ ग्रेडचे संधानकाचे काम करणे इत्यादी कामांचा समावेश आहे.
काम गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी संधानकास २८ दिवस जल उपशमन करणे आवश्यक आहे. सबब काम सुरू करण्यापासून पूर्ण होईपर्यंत ५० दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. हे काम २५ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू करण्याचे ठेकेदाराचे नियोजन असल्याने साधारण १५ डिसेंबर २०२१ पर्यंत राजाराम बंधाऱ्याच्या Wearing Coat चे काम पूर्ण होणार आहे. सबब राजाराम बंधा-यावरून होणारी वाहतुक २५ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०२१ पर्यंत बंद करावी लागणार आहे.