कोल्हापूर : मुन्ना महाडिक यांनी केलेल्या महिलांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सर्वपक्षीय महिला संघटनांच्या वतीने निषेध आणि घोषणाबाजी

कोल्हापूर प्रतिनिधी :
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक वातावरण तापले भाजपा – काँग्रेस काटे की टक्कर. त्यातच भर पडली ती म्हणजे मा. खासदार मुन्ना महाडिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यांनी त्या व्हिडिओ मध्ये महिलांबद्दल अपशब्द आणि वादग्रस्त विधान केल्यामुळे आणखी वातावरण तापले. त्यांच्या विरोधात आज कोल्हापूर ताराराणी चौक येथे सर्वपक्षीय महिलांनी जोरदार आंदोलन आणि निषेधाच्या घोषणाबाजी केली.त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.धनंजय महाडिक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात त्यांनी महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या वक्तव्याचा निषेध म्हणून काळे ड्रेस आणि काळी साडी परिधान करून महिलांनी आंदोलन केले. ताराराणी चौकात हे आंदोलन करण्यात आले. एक रुपयांचा कढीपत्ता, मुन्ना झाले बेपत्ता, अशी घोषणा देऊन महिलांना चौक दणाणून सोडला. कोल्हापूर भाजपचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, धिक्कार असो, धिक्कार असो, महिलांचा अपमान करणाऱ्या मुन्नांचा धिक्कार असो, घोषणा महिलांनी दिल्या. या वेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर ॲड. सूरमंजरी लाटकर माजी उपमहापौर सुलोचना नायकवडे, माधुरी लाड, शोभा कवाळे, वृषाली कदम, जयश्री चव्हाण, दिपाली मगदूम, जयश्री उलपे, संध्या घोटणे, वैशाल महाडिक उज्वला चौगुले , मंगला खुडे, लिला धुमाळ, चंदा बेलेकर, पद्मा माने, वैशाली जाधव, सुमन ढेरे, ॲड. शिल्पा सुतार, सविता रायकर, वैशाली डकरे, जाहिदा मुजावर, मनिषा मोटे, रुपाली कागले, सुनीता कांबरे, वनिता बेडेकर, सीमा भोसले, नंदीन रणदिवे, शीला सालपे, वैष्णवी लाड, संगिता चक्रे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.