ऋत्विक सुतारची उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील ऋत्विक महादेव सुतार याची इंग्लंड येथील टिससाईड युनिव्हर्सिटीत फूड टेक्नॉलॉजी विषयातील उच्च शिक्षण (एम. एस्सी.) अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. पुणे येथील एज्युअलायन्स एज्युकेशनल कन्सल्टन्सीच्या
कोल्हापूर शाखेमार्फत या अभ्यासक्रमासाठी परीक्षा दिली होती. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाणारा तो परिसरातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.
ऋत्विक सुतार याचे प्राथमिक शिक्षण मुरगूडच्या जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळेत तर माध्यमिक शिक्षण कागलच्या जवाहर नवोदय विद्यालयात झाले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण कोल्हापूरच्या गोपाळकृष्ण गोखले कॉलेजमध्ये झाले असून शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातून (फूड डिसाईड युनिव्हर्सिटीत टेक्नॉलॉजी ) बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ( बी.टेक.) पदवी संपादन केली आहे.
इंग्लंड येथील टिससाईड युनिव्हर्सिटीत फूड प्रोसेसिंग इंजीनियरिंग विथ ऍडव्हान्स प्रॅक्टिस या विषयात तो एम. एस्सी. करणार आहे. जगभर पसरलेल्या फूड इंडस्ट्रीज मध्ये त्याला उच्च पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. ऋत्विक ला वडील प्रा. महादेव सुतार ,आई माध्यमिक शिक्षिका सौ. भारती सुतार, भाऊ ऋषिकेश सुतार ,एज्युअलायन्स एज्युकेशनल कन्सल्टन्सी व शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी च्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.