डॉ. तानाजी हरेल यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

बिद्री प्रतिनिधी :
डॉ. तानाजी हरेल यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली असून अशा दातृत्वशाली व्यक्तिमत्वाची सध्या समाजाला गरज आहे.कोरोनाच्या महामारीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे असे प्रतिपादन सिनेअभिनेता दिगंबर कालेकर यांनी केले.
शांती हॉस्पिटलतर्फे आयोजित बिद्री (ता.कागल) येथील स्पदन हॉस्पिटलमध्ये कोविड योद्धा सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना दिगंबर कालेकर म्हणाले, कोरोनाच्या संकटकाळात जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा संकटकाळात अनेक गोरगरीबाना मोफत संसार उपयोगी वस्तू देऊन आधार दिला आहे. घरोघरी जाऊन त्यांनी मोफत तपासण्या केल्या आहेत हे उल्लेखनीय आहे.
यावेळी डॉ. तानाजी हरेल म्हणाले , ज्या समाजात आपण जन्मलो, मोठे झाले त्या समाजाचे ऋण फेडण्याची ,सेवा करण्याच्या उद्देशाने मी सामाजिक कार्य करत आहे.
यावेळी सत्कारमूर्ती डॉ. अवधूत वारके, अमर भोपळे,
या कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला.