ताज्या बातम्यामहाराष्ट्र
…..अखेर साडे सहा तासांनी एसटी ला बाहेर काढले

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
गडहिंग्लज कोट गडहिंग्लज अशी फेरी असणारी गडहिंग्लज आगाराची एसटी बस MH 14-BT 3703 शनिवारी सकाळी 11 वाजता कोटवरून सुळे मार्गे गडहिंग्लजला जात असताना सुळेच्या दिशेने येत असताना एस टी चालकाने बस बाजूपट्टीवर घेतली. बाजुपटीलगत हर घरजल योजनेची पाईप लाईन असलेने बस बाजूला घेत असताना बसचे चाक पाईप लाईनवर गेलेने बसची पूर्ण चाके खोलवर रुतून बसली.
सुमारे साडे बाराच्या दरम्यान 5 मेकॅनिक ची पार्टी आली व बस जेसीबी च्या सहाय्याने बाहेर काढण्यासाठी सुमारे 5 तास प्रयत्न सुरू झाले. मात्र बस बाहेर निघाली नाही .अखेर सायंकाळी 6 च्या दरम्यान गडहिंग्लज हुन क्रेन ला पाचारण करण्यात आले. व साडे सहा च्या दरम्यान क्रेनने सदर बस बाहेर काढण्यास यश मिळाले यासाठी सुळे ग्रामस्थानी सहकार्य केले. साडे सहा नंतर बस गडहिंग्लज च्या दिशेने रवाना झाली.