गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर : पेरूचे आमिष दाखवून नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला १० वर्षाची सक्तमजुरी
पीडित मुलीची आजी आणि अन्य नातेवाईक सकाळी कामाला गेल्याने चिमुरडी घरी एकटीच होती शिवाय गणेशोत्सवासाठी शाळेला सुट्टी होती. त्यामुळे मुलगी घरात खेळत बसली होती.

कोल्हापूर :
पाच रुपयाच्या पेरूचे आमिष दाखवून नऊ वर्षाच्या कोवळ्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या शाहुपुरीतील नराधमाला आज (सोमवार) दहा वर्षे सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. ओंकार उर्फ बंड्या उर्फ भूकंप आनंदा दाभाडे (वय 23 रा. शाहूपुरी कोल्हापूर) असे नराधमाचे नाव आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग1) श्रीमती एस. आर. पाटील यांनी खटल्याचा निकाल दिला नराधमाला ठोटावलेल्या दंडापैकी ४० हजार रुपयांची रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.