ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर विधान परिषद : पाटील – महाडिक यांच्यात ईर्ष्येची लढत ; सत्ताधार्यांसह विरोधकांना फुटीचा धोका

कोल्हापूर प्रतिनिधी :
कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत ( विधान परिषद निवडणूक ) पारंपरिक कट्टर विरोधक पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पुत्र व माजी आमदार अमल महाडीक एकमेकांना भिडणार आहेत. दोघांत काटाजोड लढत होत आहे. अवघे 416 मतदार असल्याने एकेक मत लाख मोलाचे ठरणार आहे. परिणामी सर्वाधिक मते मिळविण्यासाठी दोन्हींकडून साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर होणार हे स्पष्ट आहे. दोनच उमेदवारांत अत्यंत ईर्ष्येने निवडणूक होत असल्याने एकेक मत लाख मोलाचे ठरणार आहे. साहजिकच फोडाफोडीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. मागील निवडणुकीचा इतिहास पाहता काँग्रेस-भाजप या दोन्ही पक्षांना फुटीचा धोका आहे.