कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : सतेज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर प्रतिनिधी :
विधान परिषद निवडणुकीसाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्यासोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेस आमदार पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, निवेदिता माने, विजय देवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, चंद्रदीप नरके आदी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांची बैठक झाली. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी, आम्ही सदैव पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी, २७० मते घेऊन बंटी पाटील नक्की विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.