ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

कोल्हापूर गोकुळ : नेत्यांसमोर ‘स्वीकृत’ निवडीचे आव्हान

कोल्हापूर प्रतिनिधी :

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीनंतर सत्कार समारंभात सर्व नेते असतानाच ‘स्वीकृत’ सदस्य निवडीवरून उडालेला धुरळा ‘गोकुळ’ जिंकणार्‍या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मात्र अजूनही शांत करण्यात यश आले नाही.‘गोकुळ’च्या निवडणुकीत तडजोडीचे राजकारण करत असताना ‘स्वीकृत’साठी महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी काहीजणांना ‘स्वीकृत’चा शब्द दिल्याचे समजते. अशा परिस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची मुंबईतून स्वीकृत सदस्य म्हणून निवड जाहीर झाल्याने नेत्यांची अडचण झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे निवड होऊनही मुरलीधर जाधव यांच्यावर प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks