ताज्या बातम्या
सडोली खालसा ग्रामस्थांनी पाच हजार शेणी दान करून जपली सामाजिक बांधलकी.

सावरवाडी प्रतिनिधी :
ग्रामीण व शहरी भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ही वाढत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या च्या वतीने मोफत अंत्यसंस्कार केले जातात. या दहनविधीसाठी शेणी अपुऱ्या पडू लागल्या आहेत. करवीर तालुक्यातील सडोली खालसा गावच्या ग्रामस्थांनी पाच हजार शेणी दान करून एक सामाजिक बांधलकी जपली आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी शेणी दानचे आवाहन केले होते . या आवाहनाला प्रतिसाद देत सडोली खालसा येथील युवकांनी ग्रामपंचायत व सर्व तरुण मंडळे यांच्या सहकार्यातून पाच हजार शेणी जमा करण्यात आल्या. त्या सर्व शेणी टेम्पो मधून युवकांनी पंचगंगा स्मशान भूमी येथे कोरोनाचे सर्वनियम पाळत दान करण्यात आल्या . पालिकेच्या वतीने कृतज्ञता पत्र ही देण्यात आले.