ताज्या बातम्या
‘ त्रिपुरारी ‘ निमित्त बोरवडेत दीपोत्सव

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बोरवडे ( ता. कागल ) येथे ग्रामदैवत ज्योतिर्लिंग, हनुमान, गणेश व विठ्ठल – रुक्मिणी मंदिरांभोवती तीन हजार पणत्या लावण्यात आल्या. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हा दिपोत्सव साजरा होतो. हा सोहळा पार पाडण्यासाठी ज्योतिर्लिंग मित्र मंडळ, जोतिबा चौक आणि अजिंक्यतारा तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.