बेकायदेशीर गोवा बनावटी दारू वाहतुकी विरोधात कोल्हापुर उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची मोठी कारवाई

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामार्गे बेकायदेशीर पद्धतीने केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकी विरोधात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केल्या. पहिल्या कारवाईत गोवा बनावटीचा दारू साठा घेऊन जात असलेल्या स्विफ्ट कारवर (एमएच 04 डीएन 7854) धडक कारवाई करत एकूण 6 लाख 44 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी कोंडुरा गावाच्या हद्दीत कोडरे ते निरवडे या मार्गावर करण्यात आली.
या कारवाईत गोवा बनावटीच्या विविध कंपनीच्या दारूचे एकूण 50 बॉक्स जप्त करण्यात आले असून गौरव चंद्रकात वेंगुर्लेकर (रा. वेंगुर्ला) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील चिंचवड येथे गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत चारचाकी (एमएच ०1 व्हीए 5745) मधून केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या विविध प्रकारच्या दारुचे 3 लाख 8 हजार 760 असे एकूण 15 बॉक्स तसेच वापरण्यात आलेले चारचाकी असे एकूण 9 लाख 53 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सुजय कन्हेया छेडा,गांधीनगर,आणि शंकर विष्णुमल, वाणी, कोल्हापूर यांना ताब्यात घेण्यात आले.
सदरची कारवाई विभागीय उपआयुक्त यशवंत पवार यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, के. डी. कोळी, जवान सुशांत बनसोडे, अमोल यादव, विलास पवार व दिपक कापसे यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे व निरीक्षक पी. आर. पाटील करीत आहेत.