ताज्या बातम्या

कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण समारंभ संपन्न

कोल्हापूर :

दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी हनुमान एज्युकेशन सोसायटी संचलित श्री.आदर्श विद्यालय येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा मधील विजेत्यांना मा.श्री.पंकज देशपांडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांचे हस्ते प्रमाणपत्र आणि मेडल देवुन एकूण ११ विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला.यावेळी वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे तसेच अभ्यासूवृत्ती जोपासून यशस्वी वाटचाल सुरू करा असे मार्गदर्शन केले.त्यावेळी प्रस्तावना करतेवेळी अॅड मिलिंद जोशी यांनी राज्य घटनेबाबत माहिती देताना समता आणि बंधुता राखून मुलभूत कर्तव्य या विषयावर विद्यार्थीना मार्गदर्शन केले.सौ.माणिक सपाटे शाळेच्या सहा.शिक्षीका यांनी सुत्रसंचालन केले श्री.उदय जोशी,शाळेचे सचिव तथा माजी मुख्याध्यापक यांनी मनोगत व्यक्त केले आणि प्राधिकरणाचे सहकार्य लाभले बद्दल आभार मानले. सौ.मेघा ठकार, श्री आदर्श विद्यालय येथील मुख्याध्यापिका यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी अॅड किरण खटावकर यांचे सह इयत्ता तिसरी आणि चौथीचे विद्यार्थी आणि शिक्षक तथा शाळेतील कर्मचारी असे एकूण ६० जण उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks