ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पतीचे अपघाती निधन नंतर त्यांच्या एलआयसी पॉलिसी चे पैसे न मिळाल्यामुळे पत्नीचा आत्मदहनाचा इशारा

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

श्रीमती उमा संतोष गुरव कसबा तारळे तालुका राधानगरी यांचे पती संतोष रावण गुरव यांचे 04/01/2021 रोजी भारा घेवून येत असताना भारा मानेवर पडून मानेची शिर तुटून अपघाती निधन झाले होते त्यांच्या नावावर एलआयसी मध्ये पॉलिसी होती एलआयसी मध्ये सर्व कागदपत्रे देऊनही गेले दीड वर्ष त्यांना एलआयसी कडून कोणतीही रक्कम मिळाली नाही.

आपल्या कमावत्या पतीच्या माघारी श्रीमती उषा गुरव या मोलमजुरी करून आपला आपल्या मुलांची जबाबदारी उचलून उदरनिर्वाह करत आहेत तिथून सुद्धा उदरनिर्वाह करून घर चालवणे मुश्किल होत असल्यामुळे आपल्या पतीच्या एलआयसी पॉलिसी ची रक्कम मिळवण्यासाठी अनेक वेळा एलआयसी ऑफिस मध्ये जावून सर्व कागदपत्रे जमा करूनही एलआयसी ऑफिस मधील कोणीही त्यांना दाद देत नसल्यामुळे तसेच जर 15 ऑगस्ट पर्यंत त्यांना त्यांची रक्कम न मिळाल्यास त्यांनी 15 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या दोन्ही मुलांसह एल आय सी ऑफिस समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

जर मला व माझ्या कुटुंबाला काय झालं तर सर्वस्वी एलआयसी ऑफिस जबाबदार असेल असे त्यांनी सांगितले. या संबंधातील निवेदन त्यांनी एलआयसी मुरगुड ची शाखाधिकारी एस आर कदम यांच्याकडे सुपूर्ती केले याची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर पोलीस प्रमुख कोल्हापूर आणि मुरगुड पोलीस ठाणे यांनाही देण्यात आली.

यावेळी एलआयसी मुरगुड ची शाखाधिकारी एस आर कदम यांनी आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढून पुढच्या सर्व प्रोसिजर पूर्ण करून त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks