कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांच्यावर सुनेला शिवीगाळ करून मारहाण करणे व 1 कोटीची मागणी करणे या आरोपात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी. एन. पाटील PN यांच्यावर सुनेला शिवीगाळ करून मारहाण करणे व 1 कोटीची मागणी करणे या आरोपात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील यांचा मुलगा आणि मुलगीही या प्रकरणात आरोपी आहे.
पी. एन. पाटील यांची सून आदिती राजेश पाटील यांनी याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आदिती यांनी आरोप केला आहे की, पती (राजेश), सासरे (पांडुरंग) व नणंद (टीना) हे मला मारहाण करत होते. मानसिक छळ करत होते. 1 कोटी रुपये आण, यासाठी त्रास देत होते.
या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध कराड शहर पोलिसांत ४९८ अ, ४१७, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अदिती पाटील या सध्या वडील सुभाष पांडुरंग पाटील (वाखाण रोड, कराड) येथे आहेत. आदिती सहकारमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची पुतणी आहे.