ताज्या बातम्यामहाराष्ट्र
तारळे खुर्द येथे नरवीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी साजरी

कुडूत्री :
राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द येथे नरवीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य केरबा शेलार यांच्या हस्ते वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे तर बाळवंत सायेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या युवकांचा नाभिक समाजाच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य नाथा पाटील,आरोग्य विभागाचे डी डी कुंभार, शिवाजी शेलार, राजू शेलार,अभिजीत शेलार, विकास शेलार, बळवंत शेलार, प्रथमेश शेलार,राहुल शेलार,वैभव शेलार,वसंत शेलार नेताजी शेलार,संदिप शेलार,तानाजी शेलार, सागर शेलार,अशोक शेलार, उपस्थित होते.