ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गंगापूर गावच्या विकासासाठी १ कोटी ९० लाखाच्या निधीची ग्रामपंचायतीची मागणी.

कूर :

भुदरगड तालुक्यातील एकेकाळचे पैलवानांचे गांव म्हणून ओळख असलेल्या गंगापूर गावच्या विकासासाठी येथील ग्रामपंचायतीने १ कोटी ९० लाखाच्या निधीची मागणी एका निवेदनाद्वारे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या कार्यालयात जावून केली.या मागणीस आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रतिसाद देत सदर कामे लवकर पुर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहाणार असल्याचे याप्रसंगी सांगितले.

या मागणीबध्दल बोलताना येथील ग्रामपंचायतीचे सदस्य अजित जाधव. म्हणाले की, गावातील नळपाणी पुरवठा योजना फार वर्षापुर्वीची असल्याने ती बदलणे गरजेची आहे.त्यासाठी आमदारांनी लगेच प्रयत्नशील राहून जलजीवन योजनेतून तीच्या कामाच्या पुर्तेतेचे आदेश संबंधित कार्यालयाला देवून मंजूर आराखड्यात या योजनेचा समावेश केला.अंतर्गत रस्ते, गटर्स, स्वच्छताग्रहे, सांडपाणी व्यवस्थापन अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव या मागणीत आंम्ही केला आहे.विशेष मागासवर्गीय वस्तीमध्ये समाज मंदिराचे सुशोभिकरण करणे गरजेचे असल्याने त्याची पुर्तता करण्याचे वचन आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिले आहे.इतर कामांनाही आमदार आबिटकर यांनी प्राधान्य दिल्याने आंम्ही समाधानी आहोत. येत्या काळात या सर्व कामांच्या माध्यमातून गावचा चेहरामोहरा बदलून विकासाच्या उंबरठ्यावर गावास आंम्ही उभा करणार असल्याचा निर्धार अजित जाधव यांनी याप्रसंगी केला.

या वेळी सरपंच सीमा प्रकाश कांबळे, जेष्ट समाजिक कार्यकर्ते भैरू गुरव, प्रकाश गोडसे, संजय पाटील, राकेश लोकरे, दीपक नरतवडेकर, सुनिल जठार ( वाघापूर) आदि मान्यवर उपस्थीत होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks