ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शिंदेवाडी येथे शिवम प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील शिंदेवाडी येथे शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान घारेवाडी आयोजित रौप्य वर्षानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी यांच्या प्रेरणेतून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन मोहीम मौजे शिंदेवाडी ता कागल येथे राबविण्यात आला.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी” या उक्तीप्रमाणे समाजासाठी आपण काहीतरी देणं आहे या उद्देशाने शिंदेवाडीतील सर्व युवक अगदी तळमळीने वृक्षारोपणात सहभागी झाले.
हे वृक्षारोपण शिंदेवाडी येथील स्मशानभूमी, म्हसोबा मंदिर, यमगे- शिंदेवाडी रोड येथे करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.शिवम प्रतिष्ठान शिंदेवाडी मार्फत अनेक उपक्रम राबवले जातात.