कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित विषयासंदर्भात पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन निवेदन केले सादर

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विषयासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात प्रामुख्याने तीर्थक्षेत्र श्री अंबाबाई महालक्ष्मी परिसर विकास आराखडा, शाहू मिलच्या जागेवर राजर्षि शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळसाठी निधी तसेच कोल्हापूर येथे खंडपीठ/सर्कीट बेंच त्वरीत सुरु करण्यात यावे ,अशी मागणी करण्यात आली आहे.
त्याचबरोबर नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत संदर्भातील कामांना मिळालेली स्थगिती उठविणेत यावी व जागा उपलब्धतेचा निर्णय घेणेत यावा, कोल्हापूर जिल्हा क्रीडा संकुलाकरीता जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षि शाहू खासबाग कुस्ती मैदान संवर्धन करणेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेमधून कोल्हापूर शहरांतर्गत रस्त्यांसाठी निधी देण्यात यावा, राज्य शासनाच्या तेजस्विनी बस योजनेमधून महिलांसाठी बसेस उपलब्ध करुन देणेत याव्यात, श्री जोतिबा (वाडी रत्नागिरी) तीर्थक्षेत्र आराखड्यास मंजूरी देऊन निधी उपलब्ध करुन द्यावा, सिंधुदूर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या शिवडाव-सोनवडे घाट रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा ,अशा शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भातील विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील,आ. राजू बाबा आवळे, आ. जयश्री जाधव, आ. जयंत आसगावकर, आ. ऋतुराज पाटील, आ. राजेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.