कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान……

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर,“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानाअंतर्गत महापालिकेच्यावतीने शहरातील 18 वर्षावरील 597 महिला, माता व गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत 26 सप्टेंबर पासून “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शहरातील 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतर्गत 18 वर्षावरील महिला, माता व गरोदर स्त्रिया यांचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. शुक्रवारी 18 वर्षावरील 597 महिला, माता व गरोदर स्त्रीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी 18 वर्षावरील एकूण 348 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी उच्चरक्तदाब निदान झालेले 4, रक्तक्षय आढळलेले 2, तसेच 13 महिलांची दंतरोग तपासणी करण्यात आली. गर्भधारणापूर्व 8 महिलांची नोंदणी करुन तपासणी करण्यात आली व कुटुंब नियोजनाबाबत समुपदेशन करण्यात आले.
शुक्रवारी 67 गरोदर मातांना वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत तपासणी करण्यात आली. त्यापैकी उच्च रक्तदाब निदान झालेली 1, तसेच 33 गरोदर मातांचे कोविड लसीकरण करण्यात आले. 30 वर्षावरील एकूण 174 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यापैकी, 2 महिलांचे उच्च रक्तदाब, 1 महिलांचे हृदयसंबंधी निदान झाले आहे. 60 वर्षावरील 36 महिलांचे डोळयांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 9 महिलांना मोतिबिंदू झालेचे आढळून आले आहे. तरी 18 वर्षावरील महिला, माता व गरोदर स्त्रिया यांनी आरोग्य तपासणीकरीता नजीकच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.