रणजितसिंह पाटील संभाळतायत कोरोना रुग्णाचे मानसिक बळ.

मुदाळतिट्टा प्रतिनिधीः
मुदाळ( ता.भुदरगड )येथे रणजितदादा युवा शक्तीच्या माध्यमातून उभा असलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णाचे मानसिक बळ वाढविण्यासाठी गोकुळ व जिल्हा बँक संचालक रणजितसिंह पाटील स्वतः समुपदेशानाचे मानसशास्त्रीय धड़े देण्यात व्यस्त आहेत. याचा फायदा रुग्णाना चांगला होत असल्याचे प्रतिक्रीया रुग्णच देत आहेत.
या सेटंरमध्ये सुरु असणाऱ्या उपचार प्रणाली अन् उपक्रम याची चर्चा जिल्हयात होताना दिसते. शिवाय या पेशंटशी सातत्याने रणजितसिंह पाटील संवाद साधताना नियोजन करताना दिसतात त्यांच्या या कार्याचा विषय कुतूहलाचा बनून राहीला आहे.याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले महामारीचे जैविकयूद्ध सुरु असून आपलीही सामाजिक जबाबदारी आहे यासाठी या सेंटरची आम्ही उभारणी करुन रुग्णसेवेचा वसा हाती घेतला आहे. या मनोभावे व सेवाभावी कामामूळे आपणास एक उर्जा मिळते. या सेंटरसाठी अनेक ज्ञात आज्ञात घटकाचे मोलाचे योगदान सहकार्य लाभले असल्याचे सांगितले. जनता कोरोनाचा सूमूह संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन माध्यम सुरु आहे. पण कोविड दालनात रणजितसिंह पाटील यांचा अभिनव उपक्रम चर्चेचा विषय बनून राहीला आहे.
मुळात संसर्गाने फैलावणारा कोरोना आजार जनता या भितीखाली वावरत आहे. या कोविड सेटंर मध्ये सुमारे ७२ पेशंट उपचार घेत असून वैद्यकीय तज्ञ उपचार करत आहेत कोरोनाची भिती मनातून कमी करण्यासाठी स्वतः रणजितसिंह पाटील सातत्याने त्यांना मानासिक आधार,आहार,योगासन आदी बाबीचे प्रात्याक्षिक सादर करत असतात. निर्धारीत वेळेत सकाळी प्राणायम याची प्रात्याक्षिक तर सायंकाळी समुपदेशन करुन रुग्णाना आधार देतात याच बरोबर हॉलमध्ये असणाऱ्या एलइडी स्क्रीनवर गायन,वादन,भजन ,किर्तन असे प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याने रुग्णाचे मनोधेर्य वाढत असून पेशंट बरं होण्यास मदत होत आहे.
मुदाळ ( ता.भुदरगड ) येथील रणजितदादा युवा शक्ती मार्फत चालू असलेल्या कोविड सेंटर मधील रुग्णांची विचारपूस करताना गोकुळ संचालक रणजितसिंह पाटील