आरोग्यताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : आजअखेर 1 लाख 96 हजार 543 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर प्रतिनिधी :  रोहन भिऊंगडे

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 3681 प्राप्त अहवालापैकी 3665 अहवाल निगेटिव्ह (3 अहवाल नाकारण्यात आले) तर 13 अहवाल पॉझिटिव्ह. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 728 प्राप्त अहवालापैकी 668 अहवाल निगेटिव्ह तर 60 अहवाल पॉझिटिव्ह (98 अहवाल आरटीपीसीआरला पाठवण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 4415 प्राप्त अहवालापैकी 4270 निगेटिव्ह तर 145 पॉझीटिव्ह असे एकूण 218 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण 3 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज अखेर एकूण 2 लाख 03 हजार 771 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 96 हजार 543 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 1 हजार 537 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 218 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-11, भुदरगड-0, चंदगड-0, गडहिंग्लज-7, गगनबावडा-0, हातकणंगले-27, कागल-8, करवीर-34, पन्हाळा-10, राधानगरी-2, शाहूवाडी-15, शिरोळ-29, नगरपरिषद क्षेत्र-38, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-34, इतर जिल्हा व राज्यातील-3 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-5412, भुदरगड- 5097, चंदगड- 3888, गडहिंग्लज- 7493, गगनबावडा-724, हातकणंगले-23167, कागल-7960, करवीर-31443, पन्हाळा-10714, राधानगरी-4984, शाहूवाडी-4983, शिरोळ- 13517, नगरपरिषद क्षेत्र-22237, कोल्हापूर महापालिका 53 हजार 149 असे एकूण 1 लाख 95 हजार 147 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 624 असे मिळून एकूण 2 लाख 03 हजार 771 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण 2 लाख 03 हजार 771 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 96 हजार 543 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 691 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 1 हजार 537 इतकी आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks