किरीट सोमय्या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर; ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्यावरील आरोपाच्या पार्श्वभूमीवर राहणार कडक बंदोबस्त
भाजपचे नेते सोमय्या यांनी मंत्री मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांवर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा तसेच बेनाम व्यवहार व मनी लाँडरिंगमध्ये सहभाग असल्याचा आरोप केल्याबद्दल सोमय्या यांच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत.

कोल्हापूर प्रतिनीधी :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्याबद्दल जिल्ह्यात आंदोलन सुरू असतानाच भाजपचे नेते किरीट सोमय्या सोमवारी (दि. २०) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या दौयाकडे लक्ष लागून राहिले आहे.
भाजपचे नेते सोमय्या यांनी मंत्री मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांवर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा तसेच बेनाम व्यवहार व मनी लाँडरिंगमध्ये सहभाग असल्याचा आरोप केल्याबद्दल सोमय्या यांच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. अशा परिस्थितीत सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्यावर येण्याचा निर्णयघेतला आहे. यासंदर्भात जिल्हा पोलिस प्रशासनाने मंत्री मुश्रीफ यांच्यावरील आरोपामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी अजूनही निदर्शने होत आहेत. अशी माहिती मुंबई पोलिसांना दिली असल्याचे समजते. सोमय्या सोमवारी सकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापुरात येणार आहेत.
सकाळी श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याची बाहेरून पाहणी करणार असल्याचे समजते. तेथून मुरगूड पोलिस ठाण्याला भेट देणार आहेत. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. सासने मैदानाजवळील कार्यालयात होणाऱ्या ग्रामीणच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास ते मार्गदर्शन करणार आहेत.