किरीट सोमय्या केवळ प्रसिद्धीसाठी आरोप करतात; सुप्रिया सुळेंची खोचक टीका

NIKAL WEB TEAM :
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांचे आरोप हे प्रसिद्धीसाठी आहेत. याआधीही त्यांनी आमच्यासंदर्भात ट्रक भरून पुरावे असल्याचा दावा केला होता, असे सुळे म्हणाल्या. आरोप करून भाजपाला आनंद होतो. हा सेवाभाव आम्ही जोपासला आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.
आमचे सरकार दडपशाहीचे नाही. लोकशाहीत आपले म्हणणे मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे. पवार कुटुंबीयांवर पन्नास वर्षांपासून आरोप होत आहे. आमच्या विरोधात ट्रकभर पुरावे होते. ते कधीच समोर आले नाही. लहान असताना या आरोपांचा त्रास व्हायचा. काही लोकांना प्रसिद्धीसाठी आरोप करण्याची सवय झाली आहे. आपल्यावरील आरोपांमुळे एखादी व्यक्ती मोठी होत असेल तर आनंदच आहे.
किरीट सोमय्या यांचे आरोप हे प्रसिद्धीसाठी आहेत. यापूर्वीदेखील असेच आरोप केले होते. आमच्याविरोधात ट्रक भरून पुरावे आहे सांगण्यात आले होते. खोटे आरोप केल्यास त्यांना खूप प्रसिद्धी मिळते, आनंद होतो. त्यामुळे हा सेवाभाव आम्ही जोपासतो, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. तसेही ईडी आणि पाऊस राष्ट्रवादीसाठी ‘लकी’ आहे, या शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना टोला लगावला.