दुर्मिळ खापर खवल्या सापाला जीवदान

पश्चिम महाराष्ट्राच्या हिरव्यागार वनराईत आढळणारा एक अतिशय दुर्मिळ साप खापर खवल्या आज दृष्टीस पडला अशा या दुर्मिळ सापाला सर्प मित्र रामचंद्र डवरी यांच्याकडून जीवदान.
खापर खवल्या हा बिनविषारी व लाजाळू साप आहे जमिनीखाली राहणे जमिनीतील गांडूळ खाणे, थंडीच्या मोसमामध्ये रस्त्यावर येणारा हा साप दुर्मिळ आहे. खापर खवल्या सापाचा रंग जांभळा व तपकिरी असतो त्याच्या पाठीवर पिवळे ठिपके असतात. शेपटी आखूड व तिरकस छटाची असते,म्हणून त्याला काहीवेळा दुतोंड्या म्हणून समजला जातो, पावसाळ्याच्या सुरुवातीला मादी पाच ते आठ पिल्लांना जन्म देते हा एक निशाचर असून त्याची लांबी 28 सेंटीमीटर ते 11 इंच असते, थंडीच्या दिवसात डांबरी रस्त्यावर ऊब घेण्यासाठी तापीला पडतात आणि एखाद्या वाहनाखाली चिरडतात,तेव्हा साप दिसलास तर त्याला मारू नका, त्याला त्याच्या मार्गाने पुढे मार्गक्रमण करू द्या. त्याला जीवदान द्या निसर्गाच्या या लेकरांची आपण काळजी घेतली तरच निसर्ग आपली काळजी करेल.