ताज्या बातम्यामहाराष्ट्र
KDCC Result : पन्हाळ्याचा गड विनय कोरेंनी राखला; विरोधकाला अनामतही राखता आली नाही.

कोल्हापूर :
जिल्हा बँकेच्या पन्हाळा तालुका विकास संस्था गटातून २४३ पैकी तब्बल २०३ मते घेऊन आमदार डॉ. विनय कोरे यांनी पन्हाळ्याचा गड पुन्हा एकदा आपल्याकडे राखला. या गटातील निकालाची फक्त औपचारिकता शिल्लक होती. त्यानुसार डॉ. कोरे यांनी या गटातून सहज विजय मिळवला. या गटात त्यांच्या विरोधात विजयसिंह पाटील होते, त्यांना आपली अनामतही राखता आली नाही.