सेवाव्रत प्रतिष्ठान आणि हिंदुत्ववादी संघटनेचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे “शिवप्रताप दिन” उत्साहात केला साजरा

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
“शिवप्रताप व दिन” संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभियान आणि शौर्याचा दिवस. स्वराज्यावर आक्रमण करून आलेला अफजलखानासाठी राजे एकटेच पुरे होते. अत्यंत युक्तीपूर्ण पद्धतीने आणि प्रसंगावधान राखून अफजल खानाचा केलेला वध उभा महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही.
गेल्यावर्षी कोरोनाच्या भयावह सावटामुळे शिवप्रताप दिनाच्या सोहळ्यावर निर्बंध घालण्यात आले होते. आज 10 डिसेंबर सेवाव्रत प्रतिष्ठान आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शिवप्रताप दिन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
या सोहळ्यामध्ये सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वच्छता करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने पाण्याच्या टँकर द्वारे सगळा परिसर स्वच्छ धुऊन घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करून पूजन करण्यात आले. तसेच शाल आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला. आणि “शिवप्रताप दिनाचे”औचित्य साधून अफझलखान वधाच्या पोस्टचे अनावरण करण्यात आले. ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्र म्हणून गुणगान करून आज सकाळचा कार्यक्रम उत्साहात झाला.
दुपारी 12 ते दुपारी 2:30 च्या कार्यक्रमात लाठीकाठी ची प्रात्यक्षिके आणि हलगीच्या ठेक्यावर घोड्यांच्या कसरतीच्या खेळाच्या प्रदर्शनाने परिसर दुमदुमून गेला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकाची दररोज स्वच्छता करणाऱ्या महानगरपालिकेच्या महिला कामगारांचा साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी साखर -पेढे वाटून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या शौर्याबद्दल आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
सायंकाळी 4 वाजता परिसरातील स्वच्छता करून प्रशांत इंचानाळकर या रांगोळी कलाकाराच्या वतीने रांगोळी रेखाटन आणि पुष्पकारी करून परिसर शुभभित करण्यात आला.
सायंकाळी 6 नंतर विशाल बोंगाळे यांच्या मार्फत नेत्रदीप अतिषबाजीने परिसर उजळून निघाला.
सायंकाळी 8 वाजता शिवप्रताप दिन सांगता करण्यात आली.
यावेळी, सेवाव्रत प्रतिष्ठानचे संभाजी उर्फ बंडा साळुंखे,प्रमोद सावंत,सुहास शिंदे, अवधूत भाट्ये, मनोहर सोरप,प्रसाद मोहिते, सनी पेणकर, रमेश लाखे, अनिल चोरगे, विश्वकर्मा व्हटकर, सचिन म्हागोरे, नितेश कोकितकर,विकास भोसले,शितल चौगुले, बापू वडगावकर, रमेश लव्हटे,ऋषिकेश कोकितकर, सिद्धार्थ कटकधोंड, विनायक आवळे,राजेंद्र करंबे, महादेव साळोखे,दीपक देसाई, संजय माळी,मनिष शहा, मयूर जाधव, सेवाव्रत प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.