केडीसीसी बँक देशात नं. १ बनवू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास.
कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये कोल्हापूर शहरासह करवीर व गगनबावडा तालुक्यातील सभासदांचा झाला मेळावा.

कोल्हापूर :
केडीसीसी बँक सहकाराचे पवित्र मंदिर, त्याला तडा जाऊ नये हीच भावना.
पालकमंत्री सतेज पाटील यांची भूमिका.
छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचा मेळावा जोरात.
कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये कोल्हापूर शहरासह करवीर व गगनबावडा तालुक्यातील सभासदांचा झाला मेळावा.
भाषणात ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील सर्वच व्यवसायांना केला कर्जपुरवठा.
येणाऱ्या काळात केडीसीसी बँक शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नेणार.
येत्या वर्षभरात दोनशे कोटी नफ्याचे व दहा हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट.
पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, केडीसीसी बँक ही सर्वसामान्य माणसाला आधार देणारी बँक, ही बँक चांगली राहिली पाहिजे, ती टिकली पाहिजे- वाढली पाहिजे ही आम्हा नेतेमंडळींची नैतिक जबाबदारी.
विरोधकांनो; निवडणुकीच्या प्रचारात प्रसंगी आमच्यावर व्यक्तिगत टीका करा. परंतु; बँकेचा कारभार चांगला आहे, हेही कधीतरी मान्य करा.
देशासह जगात खाजगीकरणाचे वारे वाहत असताना सहकाराने या जिल्ह्याला भरपूर दिलय. तो टिकला पाहिजे, वाढला पाहिजे.
माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, शेतकऱ्यांचे हे वैभव टिकवायचे असेल तर कपबशी चिन्हासमोर पॅनेल टू पॅनेल मतदान करा.
आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना राबवण्यात ही बँक नेहमीच आघाडीवर राहिली आहे.
ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी ही बँक लोकाभिमुख केली.
आमदार पी. एन. पाटील म्हणाले, या निवडणुकीत संपूर्ण आघाडीचे बहुमत हे निश्चित आहे.
व्यासपीठावर आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, माजी महापौर आर. के. पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंगतात्या पाटील, ऊदयसिंगराव पाटील- कौलवकर, सत्यजित जाधव, आसिफ फरास, राजेश लाटकर, आदिल फरास, शारंगधर देशमुख आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
तसेच मदन कारंडे, प्रदीप पाटील- भुयेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, सौ. स्मिता गवळी, श्रुतिका काटकर, विजयसिंह माने आदी उमेदवारही उपस्थित होते.