ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

KDCC BANK ELECTION: सतेज पाटलांना कोरेंचा विरोध न परवडणारा!

आगामी ‘राजाराम’ कारखान्याच्या निवडणुकीचा विचार करता पालकमंत्री पाटील यांनाही कोरे यांचा विरोध परवडणारा नसेल.

NIKAL WEB TEAM :

वाढदिवसानिमित्त दिलेल्या मुलाखतीतही पी. एन. यांनी अध्यक्षपद मिळाले तर आनंदच होईल, असे सूतोवाच केले होते. कोरे यांची नाराजी, त्यातून विरोधकांची मोर्चेबांधणी यावर तोडगा म्हणून दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. पण, त्याचवेळी विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यात कोरे यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती. त्यातून कोरे हे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर दबाव आणू शकतात. आगामी ‘राजाराम’ कारखान्याच्या निवडणुकीचा विचार करता पालकमंत्री पाटील यांनाही कोरे यांचा विरोध परवडणारा नसेल. त्यामुळे कोरे यांची अध्यक्ष निवडीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अध्यक्ष निवडीची तारीख जाहीर झाल्यानंतर या घडामोडींना वेग येणार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks