KDCC Bank Election : कोल्हापूर जिल्हा बँकेवर सत्ताधारी गटाचे वर्चस्व
कोल्हापूर जिल्हा बँकेवर सत्ताधारी गटाने वर्चस्व राखले आहे. याआधी ६ जागा बिनविरोध आणि आता मतदानानंतर त्यांच्या ६ जागा निवडून आल्या आहेत.

कोल्हापूर KDCC Bank Election :
कोल्हापूर जिल्हा बँकेवर सत्ताधारी गटाने वर्चस्व राखले आहे. याआधी ६ जागा बिनविरोध आणि आता मतदानानंतर त्यांच्या ६ जागा निवडून आल्या आहेत.
जिल्ह्यातील १३ ठिकाणी ४० केंद्रांवर ७ हजार ६५१ पैकी तब्बल ७ हजार ४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शाहूवाडी, गडहिंग्लज आणि भुदरगड तालुका संस्था गटात १०० टक्के मतदान झाले. प्रक्रिया गटात ४४८ पैकी ४४६, पतसंस्था गटात १२२१ पैकी १२०७, इतर संस्था गटात ४११५ पैकी ३९९५ असे सरासरी ९८ टक्के चुरशीने मतदान झाले होते.
शाहुवाडीत सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे. सर्जेराव पाटील – पेरीडकर पराभूत झाले आहेत. तर रणवीर गायकवाड निवडून आले आहेत. रणवीर गायकवाड यांना ९९ तर सर्जेराव पाटील – पेरीडकर यांना ६६ मते मिळाली आहेत.
आजाऱ्यातील विद्यमान संचालक अशोक चराटी पराभूत झाले आहेत. सत्ताधारी गटाचे सुधीर देसाई विजयी झाले आहेत. सुधीर देसाई यांना ५७ तर अशोक चराटी यांना ४८ मते मिळाली आहेत.
शिरोळमधून मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी झाले आहेत. ‘दत्त’चे चेअरमन गणपतराव पाटील यांना ५१ मते, तर यड्रावकर यांनी ९८ मते मिळाली आहे.