केडीसीसी बँक बेरोजगार युवकांच्या पाठीशी : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन; अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जमंजुरी पत्रांचे कागलमध्ये वितरण.

कागल :
केडीसीसी बँक बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी नेहमीच त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कागलमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज मंजुरीपत्रांच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते.
भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, केडीसीसी बँकेने निव्वळ शेतीसाठी कर्जपुरवठा करणारी बँक, ही जुनी ओळख कधीच पुसली आहे. सर्वच प्रकारच्या उद्योग व्यवसायासाठी कर्जपुरवठा करण्यामध्ये बँक नेहमीच अग्रेसर राहिली आहे.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, एकट्या केडीसीसी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८०० हून अधिक बेरोजगार युवकांना विविध उद्योगधंदे व व्यवसायासाठी ८० कोटींचा अर्थपुरवठा केला आहे. उद्योग, व्यवसाय व रोजगारवाढीच्या दृष्टीने तरुणांनी केडीसीसी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. माने यांनी केले.
अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज मंजूर झालेल्याची नावे अशी…..
सचिन पांडुरंग मगदूम-बामणी, शहाजी दिनकर पाटील -केनवडे, सौरभ संजय चौगुले- म्हाकवे, अनिल शिवाजी संकपाळ -व्हनुर, विद्या दीपक पाटील- कुरणी, युवराज बाळू पाटील -केंबळी, महेश वसंत मांगले- हमिदवाडा,
साहील साताप्पा ढेरे -मिढोरी, वैभव महिपती पाटील – म्हाकवे.