ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कावळा नाका: दृश्यमानता सिग्नल आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट देऊन कामाची पाहणी

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापुरातील वाढत्या वाहन संख्येमुळे ट्रॅफिकची समस्या उद्भवू नये यासाठी शहरातील प्रमुख गर्दीच्या चौकांमध्ये असलेले सिग्नल सहजरित्या दिसावेत यासाठी उच्च दृश्यमानता सिग्नल बसविण्याचे नियोजन पालकमंत्री ना. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.
या पार्श्वभूमीवर कावळा नाका चौकातील अशा प्रकारचे ट्राफिक सिग्नल प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आले आहेत.
महानगरपालिकेतील अधिकारी यांच्यासोबत आमदार ऋतुराज पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. कोल्हापूर शहरातील प्रमुख चौकांमध्ये अशा प्रकारचे उच्च दृश्यमानता सिग्नल लवकरच बसविण्यात येणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.