ताज्या बातम्यामहाराष्ट्र

करवीर : धोंडेवाडी ते बेरकळवाडी मुख्य रस्त्याची झाली चाळण

सावरवाडी (प्रतिनिधी )  :

ऐतिहासिक पर्यटन क्षेत्र असलेल्या आणि प्राचीन धार्मिक तिर्थक्षेत्र म्हणून नावलौकीक असलेल्या सातेरी महादेव परिसरातील धोंडेवाडी ते बेरकळवाडी मुख्य वाहतुकीच्या रस्त्याची चाळण झाली . रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे वाहन धारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते .

                 सातेरी महादेव डोंगरी परिसरात पावसाने प्रमाण जादा असते . मुख्यमंत्री सडक योजनेतून गेल्या दोन वर्षा पूर्वी या परिसरातील रस्ते दुरुस्त करण्यात आले होते . निकृष्ठ दर्जाच्या  रस्ते बांधणी मुळे  रस्त्यावरील डांबरीकरण खराब झाले आहे सातेरी महादेव मंदीर परिसरात हजारो भाविकांची नेहमी वर्दळ असते वाहनांची संख्या ही जादा असते .

                धोंडेवाडी ते बेरकळवाडी या मुख्य वाहतुकीच्या रस्त्याचे डांबरीकरण खराब झाल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते रस्त्या मध्ये अनेक ठिकाणी खडी उघडी झाली आहे . 

  “नव्याने डांबरीकरण करणे गरजेचे  ” 

रस्त्या मध्ये पावसाळ्यानंतर खड्डे पडले आहेत . रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम नव्याने सुरू करण्याची गरज आहे – राम नलवडे     

( सामाजिक कार्यकर्ता धोंडेवाडी )

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks