ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी : राज्यासाठी पुढील ४ तास महत्त्वाचे , मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांसाठी मोठा अलर्ट

राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. कालपासून मुंबई राज्यातील अनेक विभागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ३ ते ४ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुढील ३ ते ४ तास राज्यातील काही विभागात पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

मुंबई, ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात येत्या ३, ४ तासात पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मुंबईला आज दुपारपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, पावसाचा वाढता जोर पाहता मुंबईला उद्या सकाळपर्यंत रेज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईला जारी करण्यात आलेला रेड अलर्ट हा उद्या शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुंबईत सतत पावसाच्या सरी कोसळत असल्याने सखल भागात पाणी साचलं आहे. तर, मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks