करवीर : प्रा सुर्यवंशी यांचे शैक्षणिक कार्य हे समाजाभिमुख : कॉग्रेस नेते राजेंद्र सुर्यवंशी यांचे प्रतिपादन

सावरवाडी प्रतिनिधी :
महाविद्यालयीन शिक्षण हे देशाची आदर्श नवी पिढी घडविण्याचे माध्यम आहे . प्रा विलास सुर्यवंशी यांचे शैक्षणिक कार्य हे समाजाभिमुख असुन त्यांच्या मौलाचे योगदानामुळे समाज परिवर्तन चळवळीला प्रेरणा मिळत आहे .ऊसे. प्रतिपादन कॉग्रेस पक्षाचे नेते व करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सुर्यवंशी यांनी केले
करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील कल्लेश्वर सहकारी दुध संस्था , छत्रपती शिवाजी नागरी पतसंस्था , जय रामदुत सहकारी दुध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स . ब .खाडे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा विलास सुर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार प्रसंगी सुर्यवंशी बोलत होते . अध्यक्षस्थानी जिल्हा मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष शामराव सुर्यवंशी होते .
यावेळी उत्तर देतांना प्राचार्य विलास सुर्यवंशी म्हणाले भोजराजाच्या पवित्र नगरीतील आदर्श संस्काराच्या बळावर शैक्षणिक क्षेत्रातील वाटचाल सुरु आहे . शिक्षण हे पवित्र माध्यम असुन त्याचा उपयोग समाज परिवर्तनासाठी होता .
अध्यक्षीय भाषणात बोलतांना कॉग्रेस नेते शामराव सुर्यवंशी म्हणाले कृषि आणि शिक्षण यांची सांगड घालत प्राचार्य सुर्यवंशी यांनी तरुणांना दिशा दिले . त्यांचे योगदान आदर्श आहे यावेळी सहकारी संस्थातर्फ प्राचार्य सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी बाबुराव हिलगे, शिवाजीराव जाधव , दिनकर गावडे , नामदेव माने , प्राचार्य विलास सुर्यवंशी , आदिची भाषणे झाली.