ताज्या बातम्या
करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीला 1 लाख 10 हजारांचा शालू तिरुपती देवस्थानकडून अर्पण

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर, तिरुपती देवस्थानकडून नवरात्रोत्सवात दरवर्षी करवीर निवासिनी अंबाबाई देवीला महावस्त्र येत असते हीच परंपरा कायम ठेवत आज गुरूवारी देवीला सोनेरी रंगाचा लाल काठ-पदराचा 1 लाख 10 हजारांचा शालू अर्पण करण्यात आला. त्याचबरोबर बांगड्या, ओटी, तिरुपती चा प्रसाद देण्यात आला आहे.तिरुमला देवस्थान समितीचे अध्यक्ष सुभा रेड्डी, सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी हा शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर देवस्थान समितीकडून या महावस्त्राची रितसर पावती करुन त्याचा स्विकार करण्यात आला.