ताज्या बातम्यामहाराष्ट्र
करवीर : खांडसरी फाटा ते शिंगणापूर फाटा रस्त्यावरील कचरा ताबडतोब हटवावा : पुरोगामी युवक संघटनेची मागणी

सावरवाडी प्रतिनिधी :
खांडसरी फाटा ते शिंगणापूर फाटा या रस्त्यावर खांडसरी फाट्यालगत दुतर्फा कचऱ्याच्या ढीगाचे, घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. सदर ठिकाणी कचरा टाकू नये अशा आशयचा बोर्ड कोल्हापूर महानगपालिकेच्या आरोग्य घनकचरा व्यवस्थापण विभागामार्फत लावण्यात आला आहे. मात्र तरीही संबंधित बोर्ड जवळच मोठया प्रमाणात साचलेला कचरा हे विदारक चित्र नागरिकांना दिसत आहे.
सदर ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून, त्यांचा देखील येणाजाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. तरीही संबंधित कोमनपा अधिकारी आणि संबंधित भागातील ग्रामपंचायत प्रशासन यांनी तात्काळ लक्ष घालून हा कचरा ताबडतोब हटवावा. दररोज याभागातील कचरा उठाव व्हावा याबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे कार्यकर्ते अभिजीत पांडुरंग कदम यांनी पत्रकाद्वारे मागणी केली आहे.